Pune Corona Update : आज नव्याने 15 मृत्यूंची नोंद; गंभीर कोरोनाबाधितांची संख्या 524 !

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका हद्दीत आज नव्याने 15 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 5 हजार 068 इतकी झाली आहे.

तसेच शहरात आज नव्याने 2 हजार 342 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या आता 2 लाख 37 हजार 736 इतकी झाली आहे.

सद्यस्थितीत पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 23 हजार 062 रुग्णांपैकी 524 रुग्ण गंभीर तर 958 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. शहरात आज एकाच दिवसात 11 हजार 890 नमुने घेण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात एकूण 13 लाख 38 हजार 689 एवढ्या नागरिकांचे नमुने घेण्यात आले आहेत.

तसेच दिवसभरात 1 हजार 789 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 2 लाख 09 हजार 606 झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.