Pune corona Update :  कोरोनाच्या 150 रुग्णांना डिस्चार्ज, 11 जणांचा मृत्यू, 293 नवे रुग्ण 

150 patients discharged from the corona, 11 died, 293 new patients

एमपीसी न्यूज – कोरोनाचे 150 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना आज,  मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. तर कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 10 पुरुष आणि एका  महिलेचा समावेश आहे. दिवसभरात 293 नवे रुग्ण आढळले. 

हडपसरमधील 31 वर्षीय युवकाचाही आज कोरोनामुळे   मृत्यू झाला.  शहरात 213 क्रिटिकल रुग्ण असून, 41 जण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत या रोगामुळे 469 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

पुणे शहरात आता कोरोनाचे 10 हजार 183 रुग्ण झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली.

गुरुवार पेठेतील 60 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगरमधील 73 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 56 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, दांडेकर पूल परिसरातील 57 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, तर 68 वर्षीय पुरुषाचा सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

तसेच  हडपसरमधील 89 वर्षीय पुरुषाचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 76 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 70 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, रामटेकडी हडपसरमधील 31 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 61 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, कोंढव्यातील 72 वर्षीय पुरुषाचा पुना हॉस्पिटलमध्ये, बारामती तालुक्यातील 70 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते. पुणे शहरात आता कोरोनाचे 10 हजारांवर रुग्ण गेले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.