Pune Corona Update: 1502 नागरिक कोरोनामुक्त, 1658 नवे रुग्ण, 35 जणांचा मृत्यू

कोरोनाचे पुणे शहरात 94 हजार 497 रुग्ण झाले आहेत. 76 हजार 686 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे संकट आटोक्यात येत असून, रविवारी तब्बल 1502 नागरिक या आजारातून मुक्त झाले. 5 हजार 713 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1658 नवे रुग्ण आढळले. 35 जणांचा मृत्यू झाला. 833 गंभीर रुग्ण असून, त्यात 507 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

कोरोनाचे पुणे शहरात 94 हजार 497 रुग्ण झाले आहेत. 76 हजार 686 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत या आजारामुळे 2 हजार 267 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 15 हजार 544 सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

फुलेनगरमधील 62 वर्षीय महिलेचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 63 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये, चंदननगरमधील 85 वर्षीय पुरुषाचा, कोंढव्यातील 70 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये, धायरीतील 52 वर्षीय पुरुषाचा, येरवड्यातील 78 वर्षीय पुरुषाचा, वारजेतील 60 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये.

शुभमंगल सोसायटीतील 76 वर्षीय पुरुषाचा, कर्वेनगरमधील 78 वर्षीय पुरुषाचा, कोथरूडमधील 62 वर्षीय महिलेचा, पर्वतीमधील 52 वर्षीय महिलेचा, कोथरूडमधील 87 वर्षीय पुरुषाचा, नाना पेठेतील 86 वर्षीय पुरुषाचा, सिंहगड रोडवरील 53 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये.

कात्रजमधील 66 वर्षीय पुरुषाचा ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, कोंढव्यातील 60 वर्षीय इसमाचा इनामदार हॉस्पिटलमध्ये, मुकुंदनगरमधील 82 वर्षीय महिलेचा परमार हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 72 वर्षीय पुरुषाचा सना हॉस्पिटलमध्ये, घोरपडीतील 75 वर्षीय पुरुषाचा AICTS हॉस्पिटलमध्ये.

धनकवडीतील 60 वर्षीय पुरुषाचा पुना हॉस्पिटलमध्ये, कसबा पेठेतील 47 वर्षीय महिलेचा, रविवार पेठेतील 64 वर्षीय पुरुषाचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, धानोरीतील 73 वर्षीय महिलेचा कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 74 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, विमाननगरमधील 75 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये.

हडपसरमधील 57 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये, आंबेगावमधील 66 वर्षीय महिलेचा औरा हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 70 वर्षीय पुरुषाचा, औंधमधील 58 वर्षीय पुरुषाचा D.H. औंध हॉस्पिटलमध्ये, धानोरीतील 62 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये.

बालेवाडीतील 68 वर्षीय पुरुषाचा आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये, एरंडवणेतील 97 वर्षीय महिलेचा, रास्ता पेठेतील 59 वर्षीय पुरुषाचा ताराचंद हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 64 वर्षीय महिलेचा, बिबवेवाडीतील 72 वर्षीय पुरुषाचा औरा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.