Pune Corona Update : आज नव्या 151 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; 169 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज (रविवारी) नव्याने 151 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 169 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची नोंद करण्यात आली आहे. 

शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 5 लाख 01 हजार 503 इतकी तर एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 90 हजार 948 झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 1 हजार 519 रुग्णांपैकी 214 रुग्ण गंभीर तर 188 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत

पुणे महापालिका हद्दीत नव्याने 03 कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 9 हजार 036 इतकी झाली आहे. शहरात आज एकाच दिवसात 06 हजार 564 नमुने घेण्यात आले आहेत.

नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.