Pune Corona Update: नवे 1,521 रुग्ण, 693 जणांना डिस्चार्ज तर 20 रुग्णांचा मृत्यू

Pune Corona Update: 1,521 new patients, 693 discharged and 20 patients died कोरोनाबाधितांची एकूण संख्या 47,065 वर, 27,418 रुग्णांची कोरोनावर मात, 1153 जणांचा मृत्यू तर 18,494 सक्रिय रुग्ण

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज (शनिवारी) नव्याने 1,521 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाबाधितांची एकूण संख्या 47 हजार 065 वर पोहचली आहे. दिवसभरात 693 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 18 हजार 494 सक्रिय कोरोना रुग्णांवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

 शहरात आतापर्यंत एकूण 2 लाख 41 हजार 541 झाली असून शनिवारी 6090 स्वॅब टेस्ट घेण्यात आल्या. त्यापैकी 1,521 चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 18 हजार 494 झाली असून त्यापैकी 673 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक आहे. 115 रुग्ण व्हेंटिलेटर सपोर्टवर आहेत. 

आज दिवसभरात 693 रुग्ण बरे झाले. पुण्यात आतापर्यंत एकूण 27 हजार 418 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. आज शहरात 20 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून शहरातील कोरोना बळींचा आकडा 1 हजार 153 वर पोहचला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.