Pune corona Update : 1563 कोरोनामुक्त, 1691 नवे रुग्ण, 43 जणांचा मृत्यू

आतापर्यंत या कोरोनामुळे 2 हजार 875 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 17 हजार 478 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

एमपीसी न्यूज – पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढतच आहे. मंगळवारी (दि. 15 सप्टेंबर) 1563 नागरिक कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 लाख 2 हजार 95 नागरिकांनी वेळीच उपचार घेऊन कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. आज 5 हजार 494 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1691 नवे रुग्ण आढळले. 43 जणांचा मृत्यू झाला.

सध्या शहरात 929 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 473 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 1 लाख 22 हजार 448 रुग्ण झाले आहेत.

आतापर्यंत या कोरोनामुळे 2 हजार 875 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 17 हजार 478 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

सध्या पुणे शहरात केवळ 1 टक्केच कोरोनाच्या चाचण्या करण्यात येत आहेत. त्यात आणखी वाढ करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे. कोरोनावर सध्या काहीही औषध नसले तरी सॅनिटायजर, मास्क, फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पुण्यात सर्वाधिक कोरोनाच्या चाचण्या करण्यात येत आहेत. दरम्यान, पुणे शहरातील कोरोनाचे संकट आणखीनच गंभीर होत चालले आहे.

पुण्यात कोरोनाचे रुग्ण जरी मोठ्या प्रमाणात वाढत असले तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे कोरोना झाला म्हणून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. वेळीच उपचार घेण्याचे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.