Pune Corona Update: कोरोनाच्या 157 रुग्णांना डिस्चार्ज, 6 जणांचा मृत्यू, 350 नवे रुग्ण

Pune Corona Update: 157 corona patients discharged, 6 die, 350 new patients. पुण्यात एकूण 11,447 पैकी 7,063 कोरोनामुक्त, 493 जणांचा मृत्यू तर 3,909 सक्रिय कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज –  पुणे शहरात कोरोनाचे 157 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला. शहरात सहा कोरोनाबाधित रुग्णांचा  मृत्यू झाला. तर दिवसभरात 350 नवे रुग्ण आढळले.

आतपर्यंत एकूण 493 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे शहरात आता 11 हजार 475 रुग्ण झाले आहेत, आतापर्यंत 7 हजार 63 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 3 हजार 909 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. सक्रिय कोरोना रुग्णांपैकी 265 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून, 53 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

पर्वतीदर्शन भागातील 60 वर्षीय महिलेचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 58 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, दांडेकर पुलाजवळील 50 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, सातववस्ती खराडीतील 59 वर्षीय महिलेचा सिमबायोसिस हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 76 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, लक्ष्मीनगरमधील 56 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला. या नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.