Pune corona Update: 1570 नागरिक कोरोनामुक्त, 1556 नवे रुग्ण, 35 जणांचा मृत्यू

शहरात सध्या 793 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 483 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाच्या आजरातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शुक्रवारी तब्बल 1570 नागरिक या आजारातून मुक्त झाले. 7 हजार 208 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1556 नवे रुग्ण आढळले. 35 जणांचा मृत्यू झाला.

शहरात सध्या 793 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 483 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 80 हजार 593 रुग्ण झाले आहेत. 63 हजार 919 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत कोरोनामुळे 1 हजार 917 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 14 हजार 757 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

हडपसरमधील 26 वर्षीय महिलेचा, शिवणेतील 58 वर्षीय महिलेचा, शनिवार पेठेतील 62 वर्षीय महिलेचा, आंबेगावमधील 74 वर्षीय पुरुषाचा, येरवड्यातील 58 वर्षीय महिलेचा, विश्रांतवाडीतील 32 वर्षीय पुरुषाचा, सिंहगड रोडवरील 83 वर्षीय महिलेचा, बिबवेवाडीतील 50 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

सोमवार पेठेतील 59 वर्षीय महिलेचा, बिबवेवाडी 69 वर्षीय आणि 70 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये, दत्तावडीतील 49 वर्षीय पुरुषाचा पुना हॉस्पिटलमध्ये, रविवार पेठेतील 71 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडीतील 74 वर्षीय महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये, कात्रजमधील 71 वर्षीय पुरुषाचा राव नर्सिग होममध्ये मृत्यू झाला.

कात्रज रोडवरील 77 वर्षीय महिलेचा दळवी हॉस्पिटलमध्ये, वारजेतील 92 वर्षीय पुरुषाचा, येरवड्यातील 56 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये, वारजेतील 55 वर्षीय पुरुषाचा, कोथरूडमधील 70 वर्षीय पुरुषाचा, कोंढाव्यातील 72 वर्षीय महिलेचा, शुक्रवार पेठेतील 60 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

कोंढाव्यातील 55 वर्षीय पुरुषाचा सना हॉस्पिटलमध्ये, घोरपडी पेठेतील 68 वर्षीय महिलेचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, लोहगावमधील 68 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, कोथरूडमधील 74 वर्षीय पुरुषाचा AICTS हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 47 वर्षीय पुरुषाचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, सदाशिव पेठेतील 78 वर्षीय पुरुषाचा देवयानी हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

पर्वतीमधील 72 वर्षीय पुरुषाचा पुना हॉस्पिटलमध्ये, सॉलिसबरी पार्कमधील 76 वर्षीय महिलेचा संजीवन हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडीतील 62 वर्षीय महिलेचा, केशवनगरमधील 60 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, गुरुवार पेठेतील 64 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, धानोरीतील 55 वर्षीय महिलेचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये, मुंढव्यातील 83 वर्षीय पुरुषाचा कमांड हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.