Pune Corona Update : 1578 रुग्ण कोरोनामुक्त, 1781 नवे रुग्ण, 40 जणांचा मृत्यू

कोरोनाचे पुणे शहरात 90 हजार 871 रुग्ण झाले आहेत.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाच्या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. शुक्रवारी तब्बल 1578 रुग्ण या आजारातून मुक्त झाले. 6 हजार 449 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1781 नवे रुग्ण आढळले. 40 जणांचा मृत्यू झाला. 827 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 498 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 90 हजार 871 रुग्ण झाले आहेत.

73 हजार 527 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे 2 हजार 168 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 15 हजार 158 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

बिबवेवाडीतील 52 वर्षीय महिलेचा, घोरपडी पेठेतील 79 वर्षीय पुरुषाचा, आंबेगावमधील 71 वर्षीय पुरुषाचा, मार्केटयार्डमधील 49 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगरमधील 57 वर्षीय पुरुषाचा, मुंढव्यातील 66 वर्षीय महिलेचा बुधराणी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

विमाननगरमधील 47 वर्षीय पुरुषाचा, येरवड्यातील 53 वर्षीय महिलेचा नोबेल हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 72 वर्षीय पुरुषाचा, गुरुवार पेठेतील 86 वर्षीय पुरुषाचा, नवी पेठेतील 41 वर्षीय पुरुषाचा, धानोरीतील 45 वर्षीय पुरुषाचा, घोरपडी पेठेतील 45 वर्षीय पुरुषाचा, वारजेतील 56 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

नारायण पेठेतील 65 वर्षीय पुरुषाचा, शनिवार पेठेतील 70 वर्षीय पुरुषाचा, पर्वतीमधील 70 वर्षीय महिलेचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, वडगांव बुद्रुकमधील 41 वर्षीय पुरुषाचा, बिबवेवाडीतील 44 वर्षीय महिलेचा, धनकवडीतील 65 वर्षीय महिलेचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

बिबवेवाडीतील 60 वर्षीय महिलेचा, हिंगणे खुर्दमधील 50 वर्षीय महिलेचा, कोथरूडमधील 75 वर्षीय पुरुषाचा, गुरुवार पेठेतील 65 वर्षीय पुरुषाचा, विमाननगरमधील 86 वर्षीय महिलेचा, आंबेगावमधील 72 वर्षीय पुरुषाचा प्लस हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

लोहगावमधील 60 वर्षीय पुरुषाचा परमार हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 58 वर्षीय महिलेचा विलू पुनावाला हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 41 वर्षीय महिलेचा, धानोरीतील 65 वर्षीय पुरुषाचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, पर्वतीमधील 68 वर्षीय पुरुषाचा, बालाजीनगरमधील 65 वर्षीय पुरुषाचा नायडू हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

येरवड्यातील 64 वर्षीय पुरुषाचा रत्ना हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 72 वर्षीय महिलेचा, औंधमधील 86 वर्षीय महिलेचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, आंबेगावमधील 64 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडीतील 90 वर्षीय पुरुषाचा, धानोरीतील 50 वर्षीय पुरुषाचा वायसीयम हॉस्पिटलमध्ये, वानवडीतील 76 वर्षीय पुरुषाचा, कर्वेनगरमधील 73 वर्षीय पुरुषाचा कमांड हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.