रविवार, सप्टेंबर 25, 2022

Pune Corona Update : पुण्यात आज 1633 नव्या रुग्णांची नोंद; 638 जणांना डिस्चार्ज, 12 मृत्यू

एमपीसीन्यूज : पुणे शहरात आज, शनिवारी नव्याने 1  हजार 633 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता 2 लाख 16  हजार 463  इतकी झाली आहे. तर कोरोनातून बरे झालेल्या 638  रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 2 लाख803  झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 12 कोरोनाबाधित रुग्णांचा आज , शनिवारी मृत्यू झाला. मृतांची आजपर्यंतची एकूण संख्या 4 हजार 937  इतकी झाली आहे.

शहरात 531 रुग्ण गंभीर

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 10 हजार723  रुग्णांपैकी 531 रुग्ण गंभीर, तर 738  रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

पुणे शहरात आज एकाच दिवसात 9 हजार 762  नमुने घेण्यात आले. पुणे शहराची एकूण चाचणी संख्या आता 12 लाख 39 हजार 264 इतकी झाली आहे.

 

spot_img
Latest news
Related news