Pune Corona Update : दिवसभरात नवे 165 कोरोनाबाधित; 252 रुग्णांना डिस्चार्ज!

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज (सोमवारी) नव्याने 165 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 252 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची नोंद करण्यात आली आहे. 

शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 4 लाख 96 हजार 937 इतकी तर एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 85 हजार 817 झाली आहे. शहरात उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांपैकी 211 रुग्ण गंभीर तर 292 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

पुणे महापालिका हद्दीत नव्याने 4 कोरोनाबाधित रुग्णांच्या तर पुण्याबाहेरील 12 मृत्यूंची नोंद झाली असून आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 953 इतकी झाली आहे. शहरात आज एकाच दिवसात 6 हजार 097 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 31 लाख 86 हजार 140 इतकी झाली आहे.

नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.