Pune Corona Update : दिवसभरात कोरोनाचे 1658 नवे रुग्ण;  जम्बो रुग्णालयासाठी 40 नर्सेस हैद्राबादहून पुण्यात

एमपीसीन्यूज : पुणे शहरात आज, शनिवारी एकाच दिवसात 5 हजार 919 नमुने घेण्यात आले. त्यामध्ये नवे 1,658 कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली. तर दिवसभरात कोरोनाच्या 39 रुग्णांचे मृत्यू झाले. दरम्यान,  कोरोना रुग्णालयातील आयसीयू विभागात सेवा देण्यासाठी हैद्राबाहून 40 प्रशिक्षित नर्सेस पुणे शहरात दाखल झाल्या आहेत. यामुळे वैद्यकीय सेवासक्षम होण्यास मोठी मदत होणार आहे.

पुणे शहरात आतापर्यंत एकूण 5 लाख 68  हजार 865 इतक्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या.

शहरात आज नव्याने 1 हजार 658  कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता 1 लाख 30  हजार 81  इतकी झाली आहे.

शहरातील 1 हजार 248  कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 1 लाख 9  हजार 371  झाली आहे.

पुणे महापालिका हद्दीत नव्याने 39  कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 3  हजार 46 इतकी झाली आहे.

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 17  हजार 664 रुग्णांपैकी 957  रुग्ण गंभीर असून यातील 495 रुग्ण व्हेंटिलेटरवर तर 462 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

 जम्बो रुग्णालयासाठी 40  नर्सेस हैद्राबादहून पुण्यात

कोरोना रुग्णालयातील आयसीयू विभागात सेवा देण्यासाठी हैद्राबाहून 40 प्रशिक्षित नर्सेस पुणे शहरात दाखल झाल्या आहेत. या नर्सेस जम्बो रुग्णालयात कर्तव्यास असणार आहेत. यामुळे वैद्यकीय सेवासक्षम होण्यास मोठी मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.