Pune Corona Update : दिवसभरात नवे 170 कोरोनाबाधित; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज (बुधवारी) नव्याने 170 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 192 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची नोंद करण्यात आली आहे. 

शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 4 लाख 99 हजार 788 इतकी तर एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 89 हजार 206 झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 1 हजार 573 रुग्णांपैकी 178 रुग्ण गंभीर तर 263 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत..

पुणे महापालिका हद्दीत नव्याने एका कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 9 हजार 009 इतकी झाली आहे. शहरात आज एकाच दिवसात 08 हजार 458 नमुने घेण्यात आले आहेत.  पुण्यातील एकूण ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 1573 इतकी झाली आहे.

नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.