Pune Corona Update : दिवसभरात नवे 171 कोरोनाबाधित; 213 रुग्णांना डिस्चार्ज!

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज (बुधवारी) नव्याने 171 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 213 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची नोंद करण्यात आली आहे. 

शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 4 लाख 99 हजार 053 इतकी तर एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 88 हजार 197 झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 1 हजार 862 रुग्णांपैकी 181 रुग्ण गंभीर तर 288 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

पुणे महापालिका हद्दीत नव्याने 04 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 994 इतकी झाली आहे. शहरात आज एकाच दिवसात 7 हजार 831 नमुने घेण्यात आले आहेत.  पुण्यातील एकूण ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 1862 इतकी झाली आहे.

नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.