Pune Corona Update : दिवसभरात 172 जणांना डिस्चार्ज;158 नवे कोरोनाबाधित

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज (मंगळवारी) नव्याने 158 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 172 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची नोंद करण्यात आली आहे. 

शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 500652 इतकी तर एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 90 हजार 231 झाली आहे. पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 1 हजार 396 रुग्णांपैकी 183 रुग्ण गंभीर तर 212 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

पुणे महापालिका हद्दीत नव्याने 03 कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली असून आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 9 हजार 025 इतकी झाली आहे. शहरात आज एकाच दिवसात 05 हजार 901 नमुने घेण्यात आले आहेत.

नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.