Pune Corona Update: दिवसभरात 179 नवे रुग्ण, 77 जणांना डिस्चार्ज तर सातजणांचा मृत्यू

Pune Corona Update: 179 new patients in a day, 77 discharged and seven died

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज (रविवारी) 179 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या 4,782 झाली आहे. आज दिवसभरात 77 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला, तर कोरोनाबाधित सात रुग्णांचा मृत्यू झाला.  

एकूण कोरोनाबाधित रुग्ण 4,782 असून यातील बरे झालेले रुग्णसंख्या 2550 आहेत. सद्यस्थितीत उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 1,977 आहे. तर, गंभीर अवस्था असलेल्या रुग्णांची संख्या 176 आहे.  47 जण व्हेंटिलेटरवर आहेत. पुण्यातील मृतांचा आकडा 255 वर गेला आहे.

गुलटेकडीतील 21 वर्षीय तरुणाचा ससून रुग्णालयात, भवानी पेठेतील 63 वर्षीय पुरुषाचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, गंजपेठेतील 71 वर्षीय महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये, सॉलिसबरी पार्कमधील 56 वर्षीय महिलेचा कर्वे रस्त्यावरील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 71 वर्षीय पुरुषाचा औंध हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 60 वर्षीय महिलेचा वायसीएम हॉस्पिटलमध्ये, नाना पेठेतील 67 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला. यामध्ये 4 पुरुष आणि 3 महिलांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यात एकूण 5 हजार 616 जणांचा कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी 2 हजार 905 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सक्रिय रुग्ण संख्या 2  हजार 444 आहे. कोरोनाबाधित रुग्णांपैकी एकूण 267 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 204  रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

शहरात 21 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोनाचे पुणे शहरात 4 हजार 782 रुग्ण झाले आहेत. 31 मे पर्यंत 5 हजारांच्या पुढे रुग्ण जाणार असल्याचा अंदाज महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. सध्या कोरोनाचा मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात येत आहेत. त्यामुळे झपाट्याने रुग्ण वाढत आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.