22.4 C
Pune
शनिवार, ऑगस्ट 13, 2022

Pune Corona Update : दिवसभरात नवे 2 हजार 547 कोरोनाबाधित; 2 हजार 771 रुग्णांना डिस्चार्ज !

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोना रुग्णाच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आजही दिवसभरात नव्या 2 हजार 547 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे पुणे शहरातील एकूण संख्या आता 2 लाख 61 हजार 659 इतकी झाली आहे.

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 32 हजार 875 रुग्णांपैकी 674 रुग्ण गंभीर तर 2880 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. शहरातील 2 हजार 771 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 2 लाख 23 हजार 541 झाली आहे.

आज 24 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 5 हजार 242 इतकी झाली आहे.

आज एकाच दिवसात 15 हजार 153 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 14 लाख 49 हजार 151 इतकी झाली आहे.

spot_img
Latest news
Related news