Pune Corona Update : दिवसभरात 2 हजार 834 नवे रुग्ण तर 808 रुग्णांना डिस्चार्ज !

एमपीसी न्यूज : पुणे शहरात आज दिवसभरात 2 हजार 834 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, तर शहरातील 808 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आतापर्यंत शहरातील एकूण रुग्णसंख्या 2 लाख 29 हजार 383 इतकी असून एकूण 2 लाख 05 हजार 478 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 18 हजार 888 रुग्णांपैकी 499 रुग्ण गंभीर तर 884 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. तसेच पुणे महापालिका हद्दीत नव्याने 15 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 5 हजार 017 इतकी झाली आहे.

आज एकाच दिवसात 12 हजार 625 नमुने घेण्यात आले आहेत. आतापर्यंत शहरात एकूण 12 लाख 99 हजार 386 इतके नमुने घेतले गेले आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.