सोमवार, फेब्रुवारी 6, 2023

Pune Corona Update : आज पुण्यात नवे 222 पॅाझिटिव्ह तर 107 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज (गुरुवारी) नव्याने 222 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 107 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची नोंद करण्यात आली आहे. 

नव्या संख्येसह शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 84 हजार 691 झाली आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 4 लाख 96 हजार 100  इतकी झाली आहे.

शहरात उपचार घेत असलेल्यांपैकी 204 रुग्ण गंभीर आहेत. तर पुण्यात 16 रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 12 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 935 इतकी झाली आहे. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 2474 इतकी झाली आहे.

शहरात आज एकाच दिवसात 9 हजार 484 नमुने घेण्यात आले आहेत.

नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

Latest news
Related news