Pune Corona Update : पुण्यात 232 नवे रुग्ण ; 290 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पुणे शहर आणि उपनगरात आज दिवसभरात 232 नवे रुग्ण आढळले. तर 290 कोरोनामुक्त नागरिकांना घरी सोडण्यात आले.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार आज 206 जणांची प्रकृती चिंताजनक असून 293 जण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात 4 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 111 इतकी झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 77 हजार 406 कोरोनामुक्त नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे.

महापालिका प्रशासनाकडून पुणेकरांना विनंती केली जात आहे की निर्धास्त न राहता घराबाहेर पडताना विविध ठिकाणी वावरताना तोंडाला मास्क लावा. हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टंन्सिग नियमांचे पालन करण्याचेही निर्देश दिले आहेत. तसेच सौम्य ते तीव्र लक्षणे आढळल्यास तातडीने अँटीजेन, स्वॅब टेस्टींग करून खबरदारी घ्यावी. तसेच पॉजिटिव्ह आढळल्यास घरातच विलगीकरण करावे. नजिकच्या रुग्णालयात औषधोपचार सुरु करण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.