Pune Corona Update : दिवसभरात 243 रुग्णांना डिस्चार्ज तर नवे 142 कोरोनाबाधित

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज (रविवारी) नव्याने 142 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 243 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची नोंद करण्यात आली आहे. 

नव्या संख्येसह शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 76 हजार 478 झाली आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 4 लाख 87 हजार 563 इतकी झाली आहे.

शहरात उपचार घेत असलेल्यांपैकी 218 रुग्ण गंभीर तर 345 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. तर पुण्यात 05 रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 02 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 779 इतकी झाली आहे.

शहरात आज एकाच दिवसात 7 हजार 200 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 28 लाख 95 हजार 106 इतकी झाली आहे.

नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.