Pune Corona Update: तब्बल 2543 रुग्णांची कोरोनावर मात, नवे 1308 रुग्ण, 39 जणांचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कोरोनावर बुधवारी तब्बल 2 हजार 543 रुग्णांनी वेळीच उपचार घेऊन विजय मिळविला. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनामुक्तांची संख्या 32 हजार 623 वर पोहचली आहे.

बुधवारी कोरोनाच्या 5 हजार 919 चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1308 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. कोरोनाचे पुणे शहरात कोरोनाबाधितांची संख्या 51 हजार 738 वर जाऊन पोहचली आहे.

शहरात 17 हजार 861 सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी 845 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 432  जण व्हेंटिलेटरवर आहेत.

दिवसभरात 39 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली. आतापर्यंत या रोगामुळे 1 हजार 254  नागरिकांचा मृत्यू झाला आहे. , अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

कात्रजमधील 70 वर्षीय महिलेचा, केशवनगरमधील 71 वर्षीय पुरुषाचा, गणेश पेठेतील 64 वर्षीय पुरुषाचा, फुरसुंगीतील 31 वर्षीय पुरुषाचा  बुधराणी हॉस्पिटलमध्ये, भवानी पेठेतील 42 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये, कसबा पेठेतील 59 वर्षीय महिलेचा, मंगळवार पेठेतील 83 वर्षीय पुरुषाचा ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

धनकवडीतील 67 वर्षीय पुरुषाचा, येरवड्यातील 9 महिन्याच्या मुलीचा भारती हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 80 वर्षीय पुरुषाचा सिमबायोसिस हॉस्पिटलमध्ये, जनवाडीतील 68 वर्षीय पुरुषाचा, बुधवार पेठेतील 55 वर्षीय पुरुषाचा दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, कर्वे रोडवरील 72 वर्षीय पुरुषाचा, हडपसरमधील 64 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

वडगांव बुद्रुकमधील 70 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 62 वर्षीय महिलेचा, धानोरी गावठाणमधील 69 वर्षीय महिलेचा नायडु हॉस्पिटलमध्ये, फुरसुंगीतील 45 वर्षीय महिलेचा सुर्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, धनकवडीतील 83 वर्षीय पुरुषाचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, महात्मा फुले पेठेतील 68 वर्षीय पुरुषाचा ओ अँड पी हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 51 वर्षीय महिलेचा, येरवड्यातील 56 वर्षीय पुरुषाचा, सिंहगड रोडवरील 71 वर्षीय पुरुषाचा, कोंढव्यातील 72 वर्षीय पुरुषाचा, आंबेगावमधील 64 वर्षीय पुरुषाचा, वानवडीतील 70 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

बोपोडीतील 67 वर्षीय महिलेचा D. H. औंध हॉस्पिटलमध्ये, शुक्रवार पेठेतील 70 वर्षीय पुरुषाचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, वानवडीतील 69 वर्षीय पुरुषाचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, बालेवाडीतील 55 वर्षीय महिलेचा सह्याद्री हॉस्पिटलमध्ये, वानवडीतील 88 वर्षीय पुरुषाचा इनामदार हॉस्पिटलमध्ये, चंदननगरमधील 65 वर्षीय पुरुषाचा श्री हॉस्पिटलमध्ये, येरवड्यातील 63 वर्षीय पुरुषाचा, संगमवाडीतील 68 वर्षीय महिलेचा जहांगीर हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.

धनकवडीतील 80 वर्षीय महिलेचा ओ अँड पी हॉस्पिटलमध्ये, बाणेर गावमधील 69 वर्षीय महिलेचा, पाषाणमधील 64 वर्षीय पुरुषाचा सिमबायोसिस हॉस्पिटलमध्ये, घोरपडे पेठेतील 61 वर्षीय पुरुषाचा, कात्रजमधील 59 वर्षीय महिलेचा भारती हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.