Pune Corona Update : दिवसभरात 2579 नवे रुग्ण तर 4046 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुण्यात आज दिवसभरात 2579 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 4046 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज पुणे परिसरातील 79 रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 18 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1411 इतके गंभीर रुग्ण उपचार घेत आहेत.

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 4 लाख 30 हजार 210 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 40701 वर पोहोचली आहे. तसेच आजपर्यंत एकूण 6991 रुग्णांचा मृत्यू झाला.

पुण्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 82 हजार 518 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर आज दिवसभरात 12276 इतक्या जणांचे स्वॅब टेस्टसाठीचे नमुने घेण्यात आले.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.