Pune Corona Update : पुण्यात 259 पॉझिटिव्ह रुग्ण ; 380 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पुण्यात आज गुरूवारी 259 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. तर संक्रांत साजरी करण्यासाठी कोरोनामुक्त झालेल्या 380 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज दिवसभरात 3 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. हे तीनही रूग्ण पुण्याबाहेरील होते. शहरातील रुग्णालयांमध्ये 208 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 82 हजार 448 वर पोहोचली. तर शहरातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 2 हजार 601 वर आली आहे.

आजपर्यंत शहरात 4 हजार 693 कोरोनाबाधित पुणेकरांचे मृत्यू झाले आहेत. तर आजपर्यंत एकूण 1 लाख 75 हजार 154 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महापालिका प्रशासनाकडून पुणेकरांनी निर्धास्त न राहता घराबाहेर पडताना, विविध ठिकाणी वावरताना मास्क, हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टंन्सिग नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच सौम्य ते तीव्र लक्षणे आढळल्यास तातडीने अँटीजेन, स्वॅब टेस्टींग करून खबरदारी घ्यावी. तसेच नजिकच्या रुग्णालयात औषधोपचार सुरू करण्याचे आवाहन केले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.