Pune Corona Update : पुण्यात आज 261 नव्या रुग्णांची नोंद; 240 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : कोरोना प्रतिबंधक लस बाजारात येणार असली तरी शहरातील दररोजची नव्या रुग्णांची संख्या 250 ते 300 च्या घरात स्थिरावली आहे. आज दिवसभरात 261 नवे रुग्ण सापडले, तर 240 जणांना घरी सोडण्यात आले.

आजपर्यंत 206 जण गंभीर असून 285 जण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात 3 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 619 इतकी झाली आहे.

महापालिका प्रशासनाकडून पुणेकरांनी निर्धास्त न राहता घराबाहेर पडताना, विविध ठिकाणी वावरताना मास्क, हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टंन्सिग नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच सौम्य ते तीव्र लक्षणे आढळल्यास तातडीने अँटीजेन, स्वॅब टेस्टींग करून खबरदारी घ्यावी. तसेच नजिकच्या रुग्णालयात औषधोपचार सुरू करण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.