Pune Corona Update : आज पुण्यात 273 नवे रुग्ण ; 345 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : शहरातील दररोजची नव्या रुग्णांची संख्या 250 ते 300 च्या घरात स्थिरावली आहे. आज दिवसभरात 273 नवे रुग्ण सापडले तर 395 कोरोनामुक्त नागरिकांना घरी सोडण्यात आले.

महापालिकेच्या आकडेवारीनुसाार आजपर्यंत 206 जण गंभीर असून 293 जण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात 3 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 2 हजार 498 इतकी झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 75 हजार 973 कोरोनामुक्त नागरिकांना घरी सोडण्यात आले आहे.

महापालिका प्रशासनाकडून पुणेकरांनी निर्धास्त न राहता घराबाहेर पडताना, विविध ठिकाणी वावरताना मास्क, हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टंन्सिग नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सौम्य ते तीव्र लक्षणे आढळल्यास तातडीने अँटीजेन, स्वॅब टेस्टींग करून खबरदारी घ्यावी. तसेच नजिकच्या रुग्णालयात औषधोपचार सुरू करण्याचे आवाहन केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.