Pune Corona Update : पुण्यात 314 नव्या रुग्णांची वाढ ; 246 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : येत्या काही दिवसात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु होणार आहे. दरम्यान आज पुण्यात दिवसभरात 314 नव्या रुग्णांची वाढ झाली. तर 246 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज पुण्यात कोरोनाबाधित 4 रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांपैकी 2 रुग्ण पुण्याबाहेरील होते. आजपर्यंत 212 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 287 रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. आतापर्यंत पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 लाख 82 हजार 189 वर पोहोचली आहे.

तर सक्रीय रुग्ण संख्या 2 हजार 725 इतकी आहे. आजपर्यंत एकूण 4 हजार 690 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर आजपर्यंतच एकूण 1 लाख 74 हजार 774 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

तरी पुणेकरांनी निर्धास्त न राहता घराबाहेर पडताना, विविध ठिकाणी वावरताना मास्क, हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टंन्सिग नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सौम्य ते तीव्र लक्षणे आढळल्यास तातडीने अँटीजेन, स्वॅब टेस्टींग करून खबरदारी घ्यावी. तसेच नजिकच्या रुग्णालयात औषधोपचार सुरू करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.