Pune Corona Update : दिवसभरात 333 रुग्णांना डिस्चार्ज तर नवे 256 कोरोनाबाधित

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज (रविवारी) नव्याने 256 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 333 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची नोंद करण्यात आली आहे. 

नव्या संख्येसह शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 4 लाख 76 हजार 235 झाली आहे. तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 4 लाख 87 हजार 421 इतकी झाली आहे.

शहरात उपचार घेणाऱ्या 2 हजार 412 रुग्णांपैकी 221 रुग्ण गंभीर तर 341 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. तर पुणे पालिका हद्दीत नव्याने 7 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 774 इतकी झाली आहे.

शहरात आज एकाच दिवसात 6 हजार 617 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 28 लाख 87 हजार 906 इतकी झाली आहे.

नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.