Pune Corona Update : दिवसभरात नवे 3463 कोरोनाबाधित; 2584 डिस्चार्ज, 30 मृत्यू

एमपीसीन्यूज : पुणे शहरात आज नव्याने 3 हजार 463 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून शहरातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता 2  लाख 54 हजार 686 इतकी झाली आहे. 2  हजार 584  कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला, तर 30  रुग्णांचा मृत्यू झाला.

कोरोना उपचारातून बरे झालेल्या 2 हजार 584 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 2 लाख 18 हजार 663 झाली आहे.

शहरात आज एकाच दिवसात 17 हजार 633 नमुने घेण्यात आले. त्यामुळे पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 14 लाख 17 हजार 194  इतकी झाली आहे.

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 30  हजार 832 रुग्णांपैकी 621 रुग्ण गंभीर तर 2294  रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

पुणे महापालिका हद्दीत नव्याने 30 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 5 हजार 191  इतकी झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.