Pune Corona Update : दिवसभरात नवे 3594 रुग्ण; 2165 डिस्चार्ज, 24 मृत्यू

एमपीसीन्यूज : पुणे शहरात आज नव्याने 3594  कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून  शहरातील एकूण संख्या आता 2 लाख 51  हजार 223  इतकी झाली आहे. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 24 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 5 हजार 161 इतकी झाली.

दिवसभरात 2  हजार 165  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.  शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 2 लाख 15 हजार 79  झाली आहे.

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 29 हजार 986 रुग्णांपैकी 612  रुग्ण गंभीर तर 1889  रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

पुणे शहरात आज एकाच दिवसात 16 हजार 799 नमुने घेण्यात आले.  पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 13  लाख 99 हजार 561  इतकी झाली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.