Pune Corona Update : पुणे शहरात आज नव्याने 366 रुग्ण आढळले

एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 9507, तर 19 रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पुणे शहरात आज दिवसभरात नव्याने 366 रुग्ण आढळले. आजमितीला शहरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दहा हजारांच्या खाली म्हणजे 9507 इतके आहे.

आज 698 कोरोनामुक्त जणांना घरी सोडले असून आत्तापर्यंत 1 लाख 43 हजार 927 करोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामधील एकूण 821 रुग्णांची स्थिती गंभीर असून 438 जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

शहर आणि उपनगरातील क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीमे अंतर्गत घरोघरी जाऊन नागरिकांची तपासणी आरोग्य विभागाच्या पथकांद्वारे केली जात आहे. तरीही नागरिकांनी मास्क, हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टंन्सिग नियमांचे पालन करावे.

तसेच सौम्य ते तीव्र लक्षणे आढळल्यास तातडीने अँटीजेन, स्वॅब टेस्टींग करून खबरदारी घ्यावी. तसेच नजिकच्या डॉक्टरकडून औषधोपचार सुरू करण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.