Pune Corona Update : पुण्यात 369 पॉझिटिव्ह रुग्ण; 818 रुग्णांना डिस्चार्ज
एमपीसी न्यूज : शहरातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. आज दिवसभरात केवळ 369 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे. रुग्ण दुपटीचा वेग हळू हळू घटत आहे. शहरात एकूण ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 7 हजार 778 इतकी आहे. तर दिवसभरात 818 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
पुण्यात दिवसभरात 21 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. यातील 10 रूग्ण पुण्याबाहेरील होते. सध्या पुण्यात 708 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 384 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
आजमितीला पुणे शहर व उपनगरात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 1 लाख 58 हजार 756 इतकी झाली आहे. आजपर्यंत पुणे शहरातील करोनाबाधिक 4 हजार 66 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आजपर्यंतच एकूण 1 लाख 46 हजार 912 करोनामूक्त लोक उपचार घेऊन सुखरूप घरी गेले आहेत.
पुणे महापालिकेच्या वतीने ‘माझे घर माझी जबाबदारी’ या राज्यव्यापी मोहीमे अंतर्गत घरोघरी सर्वेक्षण, निदान आणि औषधोपचार दिले जात आहे. शहरातील सर्व क्षेत्रिय कार्यालय स्तरावर कोविड केयर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार केले जात आहे.
नागरिकांनी तोंडाला मास्क, सॅनिटायजरने हात स्वच्छ करावे तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तीव्र किंवा सौम्य लक्षणे आढळल्यास तातडीने नजिकच्या डॉक्टरांकडून योग्य तो वैद्यकीय उपचार घेण्याचे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.