Pune Corona Update : दिवसभरात नवे 4 हजार 119 कोरोनाबाधित, 5 हजार 13 रुग्णांना डिस्चार्ज !

एमपीसी न्यूज – राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आज पुण्यात 4 हजार 119 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच शहरातील 5 हजार 13 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 3 लाख 69 हजार 477 झाली आहे.

शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्ण संख्या आता 4 लाख 19 हजार 518 इतकी झाली आहे. तर पुण्यात नव्याने 65 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर पुण्याबाहेरील 25 रुग्णांच्या मृत्यूचीही नोंद करण्यात आली आहे, आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 6 हजार 767 इतकी झाली आहे.

सध्या शहरात उपचार घेणारे 1319 इतके गंभीर रुग्ण तर 6658 इतके रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

शहरात आज एकाच दिवसात 19 हजार 537 नमुने घेण्यात आले आहेत. यामुळे एकूण टेस्ट संख्या आता 21 लाख 27 हजार 128 इतकी झाली आहे.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.