Pune Corona Update : दिवसभरात 4 हजार 135 रुग्णांना डिस्चार्ज तर 2 हजार 393 नवे कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज – पुण्यात आज नव्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज मिळालेल्या नागरिकांची संख्या अधिक आहे. आज दिवसभरात 2 हजार 393 नव्या कोरोना रुग्णांची तर 4 हजार 135 रुग्णांना डिस्चार्ज देिल्याची नोंद करण्यात आली आहे. 

पुणे महापालिका हद्दीत नव्याने 50 कोरोनाबाधित रुग्णांची तर 25 पुण्याबाहेरील रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 7 हजार 563 इतकी झाली आहे. शहरात उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये 1372 रुग्ण गंभीर तर 6302 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 4 लाख 54 हजार 457  इतकी झाली आहे.  पुण्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 21 हजार 672 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर आज दिवसभरात 12738 इतके आतापर्यंत एकूण 23 लाख 26 हजार 302 जणांचे स्वॅब टेस्टसाठीचे नमुने घेण्यात आले.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.