Pune Corona Update : दिवसभरात नवे 4 हजार 426 कोरोनाबाधित, 2 हजार 107 रुग्णांना डिस्चार्ज !

एमपीसी न्यूज – दिवसेंदिवस राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना आज पुण्यात 4 हजार 426 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच शहरातील 2 हजार 107 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 2 लाख 20 हजार 770 झाली आहे.

शहरातील एकूण कोरोनाबाधित रुग्ण संख्या आता 2 लाख 59 हजार 112 इतकी झाली आहे. तर नव्याने 27 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 5 हजार 219 इतकी झाली आहे.

सध्या पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 33 हजार 123 रुग्णांपैकी 645 रुग्ण गंभीर तर 2601 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

शहरात आज एकाच दिवसात 16 हजार 804 नमुने घेण्यात आले आहेत. यामुळे एकूण टेस्ट संख्या आता 14 लाख 33 हजार 998 इतकी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.