Pune Corona Update : दिवसभरात नवे 4 हजार 465कोरोनाबाधित तर 5 हजार 634 रुग्णांना डिस्चार्ज !

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज नव्याने 4 हजार 465 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 5 हजार 634 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज सलग पाचव्या दिवशी कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे, ही यामध्ये एक दिलासादायक बाब ठरत आहे.

पुणे शहरातील एकूण संख्या आता 3 लाख 91 हजार 495 इतकी झाली आहे. तर शहरातील एकूण डिस्चार्ज मिळालेल्यांची संख्या 3 लाख 34 हजार 782 झाली आहे.

आज एकाच दिवसात 22 हजार 962 नमुने घेण्यात आले आहेत. शहराची एकूण टेस्ट संख्या आता 19 लाख 91 हजार 476 इतकी झाली आहे.

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 50 हजार 325 रुग्णांपैकी 1328 रुग्ण गंभीर तर 6256 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

महापालिका हद्दीत नव्याने 58 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 6 हजार 388 इतकी झाली आहे.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.