Pune Corona Update : दिवसभरात 4044 नवे रुग्ण तर 4656 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुण्यात आज दिवसभरात 4044 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 4656 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज पुणे परिसरातील 66 रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 27 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1401 इतके गंभीर रुग्ण आणि 6774 इतके रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत.

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4 लाख 27 हजार 631 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 42229 वर पोहोचली आहे. तसेच आजपर्यंत एकूण 6930 रुग्णांचा मृत्यू झाला.

पुण्यात आतापर्यंत एकूण 3 लाख 78 हजार 472 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर आज दिवसभरात 16610 इतके आतापर्यंत एकूण 21 लाख 63 हजार 074 जणांचे स्वॅब टेस्टसाठीचे नमुने घेण्यात आले.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.