Pune Corona Update : दिवसभरात 4,069 नवे रुग्ण ; 4,339 रुग्णांना डिस्चार्ज, 67 मृत्यू

एमपीसीन्यूज : पुणे शहरात आज, शनिवारी नव्याने 4 हजार 069 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे शहरातील एकूण रुग्ण संख्या आता 4 लाख 23 हजार 587 इतकी झाली आहे. दिवसभरात 4 हजार 339 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

पुणे शहरात आज एकाच दिवसात 19  हजार 336  नमुने घेण्यात आले.  पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 21  लाख 46  हजार 464  इतकी झाली आहे. शहरातील 4 हजार 339  कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला. शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या 3 लाख 73 हजार 816 झाली आहे.

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या 42 हजार 907 रुग्णांपैकी 1,402 रुग्ण गंभीर तर 6, 790 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने 67  कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 6 हजार 864 इतकी झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.