Pune Corona Update : दिवसभरात पुण्यात 4077 नवे रुग्ण तर 3240 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुण्यात आज 4077 कोरोना रुग्णांची वाढ झाली 3240 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज पुणे परिसरातील 36 रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 10 रुग्णांचा मृत्यू झाला असून 919 रुग्णांवर उपचार सुरू आहेत आणि 3952 रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत.

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2 लाख 94 हजार 121 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 42741 वर पोहोचली आहे. तसेच आजपर्यंत एकूण 5488 रुग्णांचा मृत्यू झाला.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.