Pune Corona Update: दिवसभरात 472 नवे रुग्ण, 193 रुग्णांना डिस्चार्ज तर सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू

Pune Corona Update: 472 new patients, 193 patients discharged and six corona patients die in a day पुण्यातील कोरोना मृत्यूदर 4.32 टक्के, कोरोनामुक्तांचे प्रमाण 62 टक्के तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 33.49 टक्के

एमपीसी न्यूज – पुणे शहरात आज एका दिवसांत तब्बल 472 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 11 हजार 115 वर पोहचली आहे. आज दिवसभरात 193 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

दिवसभरात 472 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 11 हजार 115 झाली. आज  आढळलेले  पॉझिटिव्ह रुग्ण पुढीलप्रमाणे आहेत. ससून रुग्णालयातील 9, नायडू हॉस्पिटलमधील 314, अन्य खाजगी रुग्णालयांमधील 149 रुग्णांचे कोरोना तपासणीचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.

आज दिवसभरात 193 रुग्ण बरे झाले. पुण्यात आतापर्यंत एकूण 6906 रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुक्तांची शहरातील टक्केवारी 62.13 टक्के आहे.

शहरात आज सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील आतापर्यंत एकूण कोरोना मृत्यूंची संख्या 487 वर जाऊन पोहचली आहे. शहरातील मृत्यूदर 4.38 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

कसबा पेठेतील 70 वर्षीय पुरुषाचा साई समर्थ हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 84 वर्षीय पुरुषाचा पुना हॉस्पिटलमध्ये, रामटेकडी हडपसरमधील 30 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, दांडेकर पूल परिसरातील 65 वर्षीय पुरुषाचा ग्लोबल हॉस्पिटलमध्ये, हडपसरमधील 45 वर्षीय महिलेचा इनामदार हॉस्पिटलमध्ये, चतुःशृंगी परिसरातील 80 वर्षीय महिलेचा नायडू हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला. या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होता.

शहरात सध्या 3,722 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यांच्यावर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यापैकी गंभीर रुग्णांची संख्या 245 इतकी आहे. व्हेंटिलेटरवरील रुग्णांची संख्या 49 आहे. शहरातील सक्रिय कोरोना रुग्णांचे प्रमाण 33.49 टक्के आहे.

सध्या कोरोनाच्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्ण वाढत असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. दुसरीकडे या रोगातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.