Pune Corona Update : पुणे विभागातील 4,72,512 जण झाले कोरोनामुक्त, रिकव्हरी रेट 93.40 टक्क्यांवर

एमपीसी न्यूज – विभागातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 05 हजार 878 झाली आहे. त्यापैकी 4 लाख 72 हजार 512 कोरोनाबाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर, 19 हजार 213 सक्रिय रुग्ण आहेत. विभागात आतापर्यंत 14 हजार 153 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.80 टक्के इतके आहे तर, बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 93.40 टक्के आहे.

पुणे विभागात कालच्या बाधीत रूग्णसंख्येच्या तुलनेत आज बाधीत रुग्णाच्या संख्येमध्ये एकूण 913 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 372, सातारा जिल्ह्यात 244, सोलापूर जिल्हयात 127, सांगली जिल्ह्यात 136, कोल्हापूर जिल्हयात 34 अशी रुग्णसंख्येमध्ये वाढ झालेली आहे.

विभागामध्ये सोमवारी (दि.2) रोजी ब-या होणा-या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 428 आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 715, सातारा जिल्हयामध्ये 236, सोलापूर जिल्हयामध्ये 161, सांगली जिल्ह्यामध्ये 222 व कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 94 रुग्णांचा समावेश आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 24 हजार 666 झाली आहे. त्यापैकी 3 लाख 05 हजार 265 कोरोनाबाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या जिल्ह्यात 11 हजार 566 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आत्तापर्यंत 7 हजार 835 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.41 टक्के इतके असून बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.02 टक्के आहे.

विभागात आतापर्यंत 24 लाख 16 हजार 172 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 5 लाख 05 हजार 878 नमूने सकारात्मक आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.