Pune Corona Update : दिवसभरात नवे 5 हजार 529 कोरोनाबाधित; 6 हजार 530 रुग्णांना डिस्चार्ज !

एमपीसी न्यूज : पुणे शहरात आज नव्याने 5 हजार 529 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून शहरातील 6 हजार 530 कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला.

पुणे शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3 लाख 82 हजार 491 इतकी झाली आहे, तर एकूण डिस्चार्ज संख्या 3 लाख 24 हजार 297 झाली आहे.

शहरात उपचार घेणाऱ्या 51 हजार 920 रुग्णांपैकी 1314 रुग्ण गंभीर तर 6235 रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत.

पुणे शहरात आज एकाच दिवसात 20 हजार 409 नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता 19 लाख 46 हजार 237 इतकी झाली आहे.

महापालिका हद्दीत नव्याने 56 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 6 हजार 274 इतकी झाली आहे.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.