-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune Corona Update : दिवसभरात 515 रुग्णांना डिस्चार्ज, 450 नवे कोरोनाबाधित

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे. आज दिवसभरात 450 नव्या कोरोनाबाधितांची तर 515 रुग्णांना डिस्चार्ज दिल्याची नोंद करण्यात आली आहे. 

पुणे पालिका हद्दीत 39 कोरोनाबाधित रुग्ण तर पुण्याबाहेरील 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 340 इतकी झाली आहे. शहरात 742 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 5213 झाली आहे.

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 4 लाख 71 हजार 228  इतकी झाली आहे.  पुण्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 57 हजार 675 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर पुणे शहरात आज एकाच दिवसात 8 हजार 166 नमुने घेण्यात आले आहेत.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn