Pune Corona Update : पुण्यात दिवसभरात 5647 नवे रुग्ण; 51 मृत्यूची नोंद

एमपीसी न्यूज – पुण्यात आज 5647 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 51 जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर 4587 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज पुणे परिसरातील 44 रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 7 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1003 रुग्णांवर उपचार सुरु आहेत आणि 4662 रुग्ण ऑक्सिजन बेडवर उपचार घेत आहेत. आज दिवसभरात एकूण 27986 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली.

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 3 लाख 18 हजार 029 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 49955 वर पोहोचली आहे. तसेच आजपर्यंत एकूण 5654 रुग्णांचा मृत्यू झाला.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.