Pune Corona Update : दिवसभरात 573 नवे कोरोना रुग्ण तर 999 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाचा रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे. आज दिवसभरात शहरात नव्याने 573 नव्या कोरोनाबाधितांची तर 999 रुग्णांना डिस्चार्ज देिल्याची नोंद करण्यात आली आहे. 

पुण्यात नव्याने 29 कोरोनाबाधित रुग्णांच्या तर पुण्याबाहेरील 12 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या 8 हजार 177 इतकी झाली आहे. शहरात 981 गंभीर रुग्णांवर तर 1687 रुग्णांवर ऑक्सिजनद्वारे उपचार सुरु आहेत. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 7535 झाली आहे.

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 4 लाख 68 हजार 702  इतकी झाली आहे.  पुण्यात आतापर्यंत एकूण 4 लाख 52 हजार 990 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर पुणे शहरात आज एकाच दिवसात 8 हजार 200 नमुने घेण्यात आले आहेत.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.