Pune Corona Update : दिवसभरात 6006 नवे रुग्ण; 5609 रुग्णांना डिस्चार्ज, 75 मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यात आज दिवसभरात 6006 नवे रुग्ण सापडले आहेत. तर 5609 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर पुण्यात कोरोनाबाधीत 75 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज पुणे परिसरातील 75 रुग्णांचा तर पुण्याबाहेरील 21 रुग्णांचा मृत्यू झाला असून 1236 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंतच कोरोना उपचारातून बरे झालेल्या एकूण 2,99, 780 डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 3 लाख 60  हजार 803 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 54, 967 वर पोहोचली आहे. तसेच आजपर्यंत एकूण 6056 रुग्णांचा मृत्यू झाला.

तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.