Pune Corona Update: दिवसभरात ‘विक्रमी’ 620 नवे रुग्ण, 171 रुग्णांना डिस्चार्ज तर 6 जणांचा मृत्यू

Pune Corona Update: 620 new patients, 171 patients discharged and 6 die in a day पुण्यात आतापर्यंत 12 हजार 474 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 7 हजार 435 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे.

एमपीसी न्यूज – कोरोनाचे 171 रुग्ण ठणठणीत बरे झाक्याने त्यांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामध्ये 4 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे.  दिवसभरात तब्बल 620 रुग्ण नव्याने आढळले. ही संख्या आजपर्यंत सर्वाधिक आहे.

पुणे शहरात आतापर्यंत 12 हजार 474 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 4 हजार 529 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. त्यातील 290 रुग्णांची प्रकृती गंभीर अथवा चिंताजनक असून 60 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

आजपर्यंत शहरात एकूण 7 हजार 435 नागरिकांनी कोरोनावर मात केली आहे. आज 308 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

आतापर्यंत या आजारामुळे 510 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते. आज सहा कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली.

कात्रजमधील 62 वर्षीय महिलेचा काशीबाई नवले हॉस्पिटलमध्ये, बिबवेवाडीतील 60 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, पर्वती दर्शन भागातील 77 वर्षीय महिलेचा केईएम हॉस्पिटलमध्ये, बुधवार पेठेतील 67 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये, शुक्रवार पेठेतील 83 वर्षीय महिलेचा दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये, कोंढाव्यातील 55 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.