Pune Corona Update : आज 73 मृत्यूंची नोंद; 5313 नवे रुग्ण, 4573 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – पुण्यात आज 5313 कोरोना रुग्णांची वाढ झाली असून 73  जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतांमधील 18 रूग्ण पुण्याबाहेरील आहेत. तर 4573  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत एकूण 2,79,906 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.

सध्या 1086 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 3,39,823 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 54061 वर पोहोचली आहे. तसेच आजपर्यंत एकूण 5856  रुग्णांचा मृत्यू झाला.

आज 21, 166 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली. तरीही नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारीरिक आंतरपालन करण्याचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.