Pune Corona Update: पुण्यात कोरोनामुळे 751 रुग्णांचा मृत्यू, 64 रुग्ण व्हेंटिलेटरवर

Pune Corona Update: 751 patients die due to corona in Pune, 64 patients on ventilator पुणे शहरात आतापर्यंत 23,021 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. यातील 14411 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

एमपीसी न्यूज- पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढताना दिसत आहे. पुणे शहरात आतापर्यंत 23,021 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. यातील 14411 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 7859 रुग्णांवर पुणे शहरातील वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकट्या पुणे शहरात आतापर्यंत 751 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर अजूनही 385 रुग्णांची अवस्था गंभीर असून यातील 64 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत.

मंगळवारी दिवसभरात 640 नवीन रुग्ण आढळले तर उपचारानंतर बरे झालेल्या 672 रुग्णांना घरी सोडण्यात आले. शिवाय 21 कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये 60 वर्षावरील रुग्णांचा सर्वाधिक समावेश आहे.

सुरुवातीला दाट लोकवस्ती असणाऱ्या भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत होते. परंतु, लॉकडाऊन मधून शिथिलता मिळाल्यानंतर आता शहरातील अनेक भागात कोरोना बाधित रुग्ण मोठ्या संख्येने सापडत आहेत. कोरोनाच्या अधिकाधिक चाचण्या करता याव्यात यासाठी पुणे महापालिकेने अँटीजेन चाचण्या सुरू केल्या आहेत. त्यामुळे त्वरीत अहवाल मिळण्यास मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.