Pune Corona Update : दिवसभरात 774 पॉझिटिव्ह रुग्ण : 427 रुग्णांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : पुण्यात आज रविवारी (दि.28) दिवसभरात 774 नवे रुग्ण सापडले. तर 428 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. संथ गतीने रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आज एका दिवसात 750 चा टप्पा पार झाला आहे.

आज कोरोनाबाधित 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण 261 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू असून 500 हून जास्त रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत. आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 2 लाख 2 हजार 702 इतकी झाली आहे. तर ॲक्टिव्ह रुग्ण संख्या 4919 वर पोहोचली आहे. आजपर्यंत एकूण 4855 रुग्णांचा मृत्यू झाला.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार, कोरोनाबाधितांची संख्या संथगतीने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी. तोंडाला मास्क, हात धुणे आणि शारिरीक आंतरपालन करावे. तीव्र किंवा सौम्य लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय उपचार घ्यावे असे कळकळीचे आवाहन पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.